उत्थान
बुलढाणा जिल्ह्यातील काही नव्या दमाच्या कवींनी स्थापन केलेल्या साहित्य सागर साहित्य संघाच्या वतीने 'उत्थान ' प्रातिनिधीक प्रकाशित केला आहे. या प्रातिनिधीक काव्य संग्रहामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नवोदीत कवींबरोबर महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत कविंच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने लेखन करणाय्रा प्रतिभावंतासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. ' उत्थान ' मधिल कविता आशयघन आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारी आहे. प्रमाण मराठी भाषेतील कवितेबरोबर आपल्या बोलीभाषेत लिहील्या गेलेल्या काही कविता काव्यरसिकांना भरभरुन आनंद देतात
शेती, शेतकरी, कष्ठकरी, दलित, पिडीत आणि पिचलेल्या समुहाचा विचार प्रामुख्याने या कवितेतुन व्यक्त झालेला आहे. त्याच बरोबर मानविय संबधाचे मनोज्ञ चित्रण उत्थान मधिल कविंनी समर्थपणे केलेले आहे. संदीप गवई यांनी संपादन केलेल्या उत्थान मधिल कविता अभ्यासकांना निश्चित उपयोगी ठरणार आहेत.
पुस्तकाचे नाव- उत्थान
संपादक- संदीप गवई
प्रथमावृत्ती- सप्टेबंर २००६
प्रकाशक- साहित्य सागर साहित्य संघ
पृष्ठे ४०
किमंत- चाळीस रुपये
पुस्तक खरेदी करण्यासाठी लेखकाला खालील पत्त्यावर संपर्क साधा.
संदीप गवई
इंदिरा नगर मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा
भ्रमणध्वनी ९०११७८८९२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा